प्राध्यापिकेकडून विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

चिखलदऱ्याच्या शाळेमधील एका प्राध्यापिकेने अकरावीतील विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून प्राध्यापिकेला अटक केली आहे.

सदर विद्यार्थी हा वसतिगृहात वास्तव्यास आहे. प्राध्यापिका मागील काही दिवसांपासून त्याच्याशी लगट करीत होती. ‘तू मला खूप आवडतो, तू मला हवा आहे,’ असे सांगत विकृत चाळेही करायची. या प्रकाराने हादरलेल्या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी शिक्षकांना याविषयी सांगितले. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापनाकडे प्रकरण पाठविण्यात आले. व्यवस्थापनाने चौकशी समितीसुद्धा गठीत केली. सोबतच मंगळवारी चिखलदरा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी प्राध्यापिकेविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच तिने बुधवारी सकाळी रजेचा अर्जदेखील पाठविल्याची माहिती आहे. अधिक तपास चिखलदराचे ठाणेदार के. बी. ठाकरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *