अंध तरुणांकडून राजगड सर

स्वरगंधार सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष प्रवीण पाठारे आणि वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी अंध तरुणांसाठी राजगडचा ट्रेक आयोजित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या ट्रेकमध्ये तरुणांनी अवघ्या अडीच तासात स्पर्शज्ञानाने गड सर केला.

शिवाजीनगरमधील साई मंदिर येथून सहल आयोजित करण्यात आली होती. या वेळी सागर धुमाळ, दादा लाटे, पूनम नातू, वसुधा देशपांडे, विश्वास नातू, श्रीरंग कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. ट्रेकमध्ये पूना ब्लाइंड मेन असोसिशएन या संस्थेतील मुले सहभागी झाली होती. संस्थेच्या कश्मिरा ठाकूर, किशोर व्होरा, सुभाष मदन अपर्णा मोरे आदींनी सहकार्य केले. गड चढल्यावर चंद्रकांत गोरे यांनी गडाचा इतिहास सांगितला. गडावरील वास्तूला हाताने स्पर्श करून तेथील इतिहास अनुभवण्याचा आणि भारावण्याचा आनंद या तरुणांनी घेतला. रामचंद्र भोईर, सुशीला भोसले यांनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *