एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजले

मुंबईत एका व्यावसायिकाने एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजले आहेत. गृहनिर्माण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी डील असून एखाद्या व्यक्तीने एका फ्लॅटसाठी पहिल्यांदाच इतके पैसे मोजलेत. या व्यावसायिकाचे नाव नीरज बजाज असं आहे. त्याने वरळीतील अॅनी बेझंट रोडवर असणाऱ्या इमारतीत पन्नासाव्या मजल्यावर 1 हजार 587 चौरस मीटरचा हा फ्लॅट खरेदी केला आहे.

फ्लॅटसह 8 कार पार्किंगची जागा

नीरज बजाज यांना या महागड्या फ्लॅटसह 8 कार पार्किंगची जागाही मिळणार आहे.  याआधी 2017 साली व्यावसायिक देवेन मेहता यांनी पेडर रोड इथं लोधा अल्टामाउंटमधल्या एका फ्लॅटसाठी 57 कोटी 45 लाख रुपये मोजले होते. मुंबईत नोटांबदीनंतर रिअल इस्टेटच्या क्षेत्रात मंदी  दिसून आली होती. मात्र टॉवरमधील फ्लॅटसला आजही चांगले भाव असल्याचं दिसून येत आहे. दक्षिण मुंबईतील फ्लॅटच्या  किंमती आजही गगनाला भिडलेल्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *