नालासोपाऱ्यातून अपहरण झालेल्या मुलीची गुजरातमध्ये हत्या

नालासोपाऱ्यातल्या 6 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये हत्या करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकरण पुढे आलं आहे. या मुलीचा मृतदेह महिला स्वच्छता गृहात फेकून देण्यात आला होता. गुजरातमधील नवसारी रेल्वे स्थानकात महिला स्वच्छता गृहात रात्री हा मृतदेह सापडला आहे. नालासोपाऱ्यात राहणारी  अंजली संतोष सरोज असं या 6 वर्षीय मुलीचं नाव आहे.

नालासोपारा पूर्वेला असणाऱ्या साई अर्पण अपार्टमेंट सोसायटीच्या समोरून शनिवारी मुलीचे एका अज्ञात महिलेने अपहरण केले होते. मुलीला घेऊन जाताना आरोपी महिला cctv मध्ये कैद झाली आहे. याबाबत तुलिंज पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. शनिवारी रात्री 8 वाजून 05 मिनिटाला मुलीचे अपहरण झाले होते. cctv फुटेच्या आधारे अपहरण करणाऱ्या महिलेचे रेखाचित्र बनवण्यात आले आहे. मात्र अजूनही या आरोपी महिलेचा शोध लागला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *