पत्नी, मुलांवर चाकू हल्ला करुन पतीची आत्महत्या

आर्थिक विवंचनेमुळे एका व्यक्तीने पत्नी आणि मुलांवर वार करुन स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीत घडलीये.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि चौघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पत्नी आणि मुले अद्याप मृत्यूशी झुंज देत आहेत.

दिल्लीत घडली घटना

पोलिसांच्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील संगम विहारमध्ये राहणारे जितेंद्र गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. यामुळेच त्यांनी हे मोठे पाऊल उचलले. जितेंद्रने आधी आपली पत्नी आणि मुलांची हत्या करण्यासाठी चाकूने वार केले. त्यानंतर स्वत:वर चाकूने हल्ला केला.

राजधानी दिल्ली एकीकडे धुळवड साजरी करत असताना मात्र संगम विहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. जितेंद्र पेशाने वकील आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांना आर्थिक तंगी जाणवत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *