मुंबईत होळीच्या रंगाचा बेरंग, २५ हून अधिक जणांना रंगाची बाधा

होळीच्या रंगाचा बेरंग पाहायला मिळालाय. २५ हून अधिक जणांना रंगाची बाधा झालाय. १२ जणांना डोळ्याचा त्रास झालाय. त्यांना पालिकेच्या केईएमच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.

होळी खेळताना प्रामुख्याने रंगाचा वापर करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात रंग गेल्याने तर अनेकांना त्वचेचा त्रास होवू लागल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले आहेत.

रंगाची बाधा झालेल्यांना केईएमसह पालिका रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. केईएममध्ये उपचारासाठी आलेल्या १७ रूग्णांपैकी १२ जणांना डोळ्यांचा त्रास जाणवत आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *