चाइल्ड पॉर्न; व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक

अश्लिल व्हिडीओ प्रसारित करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उध्वस्त केली. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील निखील वर्मा (२०) या व्हॉट्सअॅप अॅडमिनला अटक केली आहे. याप्रकरणी सीबीआयने मुंबई, दिल्ली, नोएडा आणि कन्नौजमध्ये तपास सुरू केला होता.

हा तरुण ‘किड्सएक्सएक्सएक्स’ हा व्हॉट्सअॅप ग्रुप चालवत होता. या ग्रुपमध्ये अमेरिका, चीन, न्यूझिलंड, मेक्सिको, अफगाणिस्तान, पाकिस्तान, ब्राझिल, केनिया आणि श्रीलंकेतील ११९ सदस्य असल्याचेही सीबीआयने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *