धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना ९ पट जमिनीचा मोबदला

मंत्रालयात आत्महत्या करणारे ८५ वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना जमिनीच्या मोबदल्यापोटी ९ पट रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे धर्मा पाटील यांना त्यांच्या जमिनीचे ५४.४८ लाख रुपये मिळणार आहे.

याआधी त्यांच्या पाच एकर बागायती जमीनीसाठी फक्त ६ लाख रुपये देण्यात आले होते. पण धर्मा पाटील यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर धुळ्यातील विखरणमध्ये होऊ घातलेल्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी संपादित १९९ एकर जमीनीचं पुनर्मूल्यांकन करण्यात आलं. यानुसार आता धर्मा पाटील आणि त्यांच्यासोबत आणखी १२ शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला मंजूर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *