आपल्या मोबाईल फोनची बॅटरी तोंडात घालून ती चेक करत असाल तर थांबा! आयफोनची बॅटरी खरी आहे की नकली हे तपासण्यासाठी बॅटरी दातानं दाबणं चीन मधील एका व्यक्तीला चांगलच महागात पडलं आहे. कारण अशा प्रकारे आयफोनची बॅटरी तपासताना त्या बॅटरीचा स्फोट झालाय.
खरं तर आयफोनची लीथियम बॅटरी मोबाईल युजर्सला सहज काढता येत नाही. मोबाईल दुरूस्त करणाऱ्या टेक्निशन्सना मोबाईलची बॅटरी काढता येते. असं असताना या व्यक्तीनं बॅटरी आपल्या दाताखाली चावली अन् मोठा स्फोट झाला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत मोबाईल स्टोरमध्ये एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसतोय. त्या व्यक्तीनं आयफोनची बॅटरी तोंडात घालून काढली अन् लगेच स्फोट झाला. घटनेत कोणीही जखमी झालं नसलं तरी बॅटरीचा स्फोट होण्यामागचं खरं कारण समोर आलं नाही.
