‘गीतांजली एक्सप्रेस’ मोठ्या दुर्घटनेतून वाचली!

मनमाड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म नं 2 च्या डाऊनलाईनच्या रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना सकाळी 11 वाजता घडली.

तडा गेला तेव्हा गीतांजली एक्सप्रेस या रुळावरून धावत होती. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

रेल्वे स्थानकावरील दोन वेटरना रुळाला तडा गेल्याचं दिसल्यानंतर त्यांनी स्टेशन मास्तरला याची तात्काळ माहिती दिली.

त्यानंतर रुळाची दुरूस्ती करण्यात आली. या दुरूस्तीच्या कामामुळे काही गाड्या इतर प्लॅटफॉर्मवरून सोडण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *