तणावाची परिस्थिती आणि हिंसाचाराची भिती असल्याने मुंबईच्या बहुतांश भागातटॅक्सी आणि रिक्षा धावताना दिसत नाहीयत.
शाळा-महाविद्यालये
चेंबूर, कुर्ला, टिळक नगर भागतील काही शाळांना सुट्टी, पण गिरगाव, ग्रॅण्टरोड, चर्चगेट भागातील काही शाळा सुरु.
मुंबईतील बहुतांश महाविद्यालये सुरू आहेत, मात्र बऱ्याच महाविद्यातयातील बारावी पूर्व परीक्षा होत्या त्या मात्र पुढे ढकलण्यात आल्या आहेत, आज महाविद्यालये नियमित सुरू असल्याची प्राचार्यांची माहिती
गोंवडी, मानखुर्द, मुलुंड, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, कांदीवली पूर्व, मालाड पूर्व, दहिसर पूर्वच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
शाळांमध्ये ३० ते ४०% विद्यार्थ्यांची हजेरी आहे, मुंबई मुख्याध्यापक संघटनेची माहिती.
रास्ता रोको – वाकोल पाईप लाईन, कला नगर बांद्रा, वरळी नाका, बर्वे नगर घाटकोपर येथे रास्ता रोकोचा प्रयत्न झाला.
नायगाव दादरमध्ये बीडीडी चाळीतील रहिवीशांनी परिसरात मोठा मोर्चा काढला आहे.
