पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री बारा विशेष लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री अनेक जण गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह तसेच मुंबईतील चौपाटय़ांवर गर्दी करतात. या नागरिकांना परतीसाठी सुलभ वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री विशेष लोकल गाडय़ा सोडण्यात येतात. त्यानुसार यंदा पश्चिम रेल्वेकडून चर्चगेट ते विरार ते चर्चगेट दरम्यान आठ तर मध्य रेल्वेकडून कल्याण ते सीएसएमटी ते कल्याण दरम्यान दोन आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यान दोन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरील फेऱ्या
अप मार्ग
- विरार ते चर्चगेट-मध्यरात्री १२.१५ वा., मध्यरात्री १२.४५ , मध्यरात्री १.४० वा., मध्य. ३.०५
डाऊन मार्ग
- चर्चगेट ते विरार-मध्यरात्री १.१५ वा., मध्यरात्री २.०० वा., मध्यरात्री २.३० वा., मध्यरात्री ३.२५ वा.
मध्य रेल्वेवरील फेऱ्या
- सीएसएमटी ते कल्याण- मध्यरात्री १.३० वा.
- कल्याण ते सीएसएमटी- मध्यरात्री १.३० वा.
- सीएसएमटी ते पनवेल-मध्यरात्री १.३० वा.
- पनवेल ते सीएसएमटी- मध्यरात्री १.३० वा.
