विरूष्काचा स्वप्नवत सोहळा प्लॅन करणारी ‘ही’ कोण ?

लगीन घरात घाई नसली तर नवलच…. कपड्यांच्या खरेदीपासून पाहुण्यांच्या पाहुणचारापर्यंत सगळं काही पाहावं लागतं. मात्र कितीही काम, गडबड असली तरी सगळे अगदी आनंदाने ही काम करत असतात. पण सध्या ‘डेस्टिनेशन वेडिंग’हा नवा ट्रेंड सुरू झालेला दिसून येतो. अशा पद्धतीच्या विवाहात अधिक तयारीची आवश्यकता असते.

या व्यक्तीने सांभाळली लग्नाची जबाबदारी 

नुकतचं झालेलं विराट-अनुष्काचं लग्न पहा ना. इटलीतील टस्कनीमध्ये मोठ्या थाटामाटत त्यांचा लग्नसोहळा पार पडला. मात्र त्यात सारं काही सोबर, छान दिसून आलं. या विवाहसोहळ्याची जबाबदारी उत्तमरित्या बजावणारी व्यक्ती म्हणजे लखनऊची देविका नारायण.

कोण आहे ही देविका ?

हाय प्रोफाइल डेस्टिनेशन वेडिंग प्लॅनर्सच्या यादीत देविका अत्यंत लोकप्रिय आहे. देविकाने अनुष्का विराटच्या लग्नसोहळ्यात छायाचित्रकारांपासून इतर सर्व व्यवस्था सांभाळली होती. देविका मुळची लखनऊची आहे. तिचे शालेय शिक्षण ‘लॉरेटो कॉन्व्हेंट’या शाळेत झाले असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली. तिथे प्रतिष्ठित लेडी श्रीराम महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

देविकाची ख्याती वाढली…

विराट-अनुष्काच्या लग्नाची जबाबदारी तिने तिच्या पतीच्या साथीने उत्तमरित्या पार पाडली. विरुष्काच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर देविकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट करत या खास क्षणांमध्ये आपल्याला सहभागी करुन घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
विरुष्काच्या लग्नाचे यश हे देविकाची ख्याती नक्कीच वाढवेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *