जालन्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा बुडून मृत्यू

जालन्यात कस्तुरवाडीतील गावाकाठच्या नदीवर धुणे धुण्यासाठी गेलेल्या तीन मुलींना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तिन्हीही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी म्रूत्यू झाल्याची घटना घडलीय.

सायमा पठाण, जाला मोईन आणि राणी मोईन अशी मृत पावलेल्या मुलींची नाव आहेत. नदीच्या किनाऱ्यावर या मुली कपडे धुत असताना एका मुलीचा तोल गेल्याने ती पाण्यात दिसेनाशी झाली.

तिला वाचवायला दुसरीने तिला पकडलं पण दोघीही पाण्यात डुबत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिसऱ्या मुलीनंही पाण्यात उडी दोघींना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या तिघीही पाण्यात ओढल्या गेल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *