पुण्यात दोन भरधाव वाहनांना आग, जिवीतहानी नाही

पुण्यात भरधाव वाहनांना आग  लागल्याच्या सलग दोन घटना घडल्यात.. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी महामंडळाची दादर-पुणे विना वाहक निम आरामबस जळून खाक झालीय.

बोरघाटाजवळ पुणे लेनवर या बसला पहाटेच्या सुमारास आग लागली.. सुदैवानं या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही.. तर दुसरी घटना सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूरजवळ घडली.

इंदापुरातील काळेवाडीइथं डाळ वाहतूक करणा-या ट्रकनं अचानक पेट घेतला.. सुदैवानं या दुर्घटनेतही कोणतीही जिवीत हानी झाली नसली तरी डाळवाहतूक करणारा ट्रक जळून खाक झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *