ठाण्यानंतर मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी, सह आयुक्तांना मारहाण

ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे. पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांनी बेदम मारहाण  केलीय.

अंधेरी-कुर्ला रोडवरील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मेट्रो स्टेशनच्याखाली फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या देवेंद्रकुमार जैन यांना मारहाण करण्यात आलीय. फेरीवाल्यांनी जैन यांचे कपडेही फाडले. या मारहाणीच्या व्हिडिओ समोर आलाय.

पोलिसांनी याप्रकरणी तीन हल्लेखोर फेरीवाल्यांना अटक केलीय. मात्र या घटनेमुळं मुंबईतल्या फेरीवाल्यांची दादागिरी वाढत चालल्याचं पुढं आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *