दरड कोसळल्याने सिंहगड रस्ता आठ दिवसांसाठी बंद

तुम्ही या वीकेण्डला तुमचा सिंहगडावर जाण्याचा प्लॅन असेल, तर तो तुम्हाला रद्द करावा लागणार आहे. कारण सिंहगड रस्ता  आठ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे जिल्हाधिका-यांनी हे आदेश दिलेत. आठ दिवसांपूर्वी या रस्त्यावर दरड कोसळली होती. दरड कोसळण्याचा अंदाज येताच हा रस्ता तेव्हा बंद करण्यात आला.

त्यानंतर या रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे मोठी हानी टळली. आता पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता हा रस्ता आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *