नाहूर रेल्वे स्थानकाजवळ आढळलं अर्भक

  नाहूर रेल्वे स्थानकाच्या जवळ एक अर्भक   अज्ञात इसमानं सोडून गेल्याची घटना समोर आली. संदेश शिंदे या व्यक्तीनं पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून नाहूर स्थानकाजवळ एका भिंतीच्या खाली अर्भक बेवारस सोडलल्याचं आणि त्याला सावित्री बाई रुग्णालयात घेऊन गेल्याचं  सांगितलं.

भांडुप पोलिसांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अर्भकाची प्रकृती चांगली असून तिथेच त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्या अर्भकाला बाल कल्याण मंडळाकडून परवानगी घेऊन त्यांच्या आदेशानुसार बाल संगोपन संस्थेकडे सोपवण्यात येणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्द गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *