मेडिकल चेकअपसाठी रोहित मायदेशात

श्रीलंका दौऱ्यावर गेलेला भारताचा क्रिकेटर रोहित शर्मा रुटीन मेडिकल चेकअपसाठी मुंबईत दाखल होतोय.

बीसीसीआयच्या मेडीकल टीमने ही माहिती दिलीये. सर्जरीनंतरच्या रुटीन मेडीकल चेकअपसाठी रोहित मायदेशात परतततोय. फिटनेस अथवा आरोग्याबाबत कोणतीही समस्या नाही. तीन ऑगस्टला तो मुंबईसाठी रवाना होईल आणि लगेचच चार ऑगस्टला तो संघात सामील होईल, अशी माहिती मेडीकल टीमने दिली.

नोव्हेंबरमध्ये शर्माच्या मांडीला दुखापत झाल्याने सर्जरी करण्यात आली होती. यासाठीच्या चेकअपसाठी तो मुंबईत आलाय.

श्रीलंकेविरुद्ध भारताचा दुसरा कसोटी सामना सुरु आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीमुळे भारताने मजबूत धावसंख्या उभारलीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *