पालघरमध्ये खड्ड्यामुळे महिला बाईक रायडरचा मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्यामुळे महिला बुलेट रायडर जागृती होगाळेचा मृत्यू झाला आहे.  मूळची मुंबईची असलेली जागृती होगाळे मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेती गावाजवळ रायडिंग करत होती. यावेळी खडड्यामुळे जागृतीची 350 सीसी रॉयल एन्फिल्ड थंडरबर्ड आदळली व ती खाली पडली. या अपघातात जागृती ट्रकखाली चिरडली गेल्यानं ती गंभीर स्वरुपात जखमी झाली.
यावेळी तिच्यासोबत असलेल्या दोन बाईक रायडर्संनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.  जागृतीच्या पश्चात पती विराज आणि 9 वर्षांचा मुलगा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *