या मुलाला आठवतात मागील जन्माच्या घटना

पुनर्जन्माबाबत मत मतांतरे असू शकतात, पण हरियाणाच्या या लहान मुलाबाबत जाणून घेतले, तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जिंदमधील जलालपुरा येथे एका मुलाचा जन्म चार वर्षांपूर्वी झाला. त्याचे नाव लविश असे ठेवण्यात आले. त्याला बोलता यायला लागल्यावर त्याच्या तोंडून ‘रामरा’ हा एकच शब्द सतत ऐकू यायचा. रामरा हे गाव जलालपुरापासून जवळच आहे. आपल्या आईचे नाव कमला असल्याचे हा मुलगा सांगतो. अखेर कुटुंबीय त्याला घेऊन रामरा या गावात गेले. गावाजवळ येताच त्याने पुढचा रस्ता दाखवायला सुरुवात केली. गावात आल्यावर आपल्या घराचा पत्ताही त्याने सांगितला. असे सांगितले जात आहे की, या गावात ११ वर्षांपूर्वी संदीप नावाच्या एका मुलाचा विजेचा धक्का लागून शेतात मृत्यू झाला होता. ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या शेतात तो सर्वांना घेऊन गेला.पुनर्जन्माबाबत विज्ञानाचे दावे वेगळे असतीलही, पण या दोन कुटुंबांना मात्र हा पुनर्जन्माचा प्रकार वाटत आहे. संदीपच्या कुटुंबीयांचे असे म्हणणे आहे की, संदीप आता लविशच्या रूपात जन्म घेऊन आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *