पराभवानंतरही मोदींनी महिला संघाचे केले कौतुक

महिला  क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतीय संघाचा इंग्लंकडून ९ धावांनी पराभव झाला. संघाचा पराभव झाला असला तरी या महिला क्रिकेटर्सनी लाखो मने मात्र जिंकली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भारतीय महिला क्रिकेट संघाचे कौतुक केलेय. आमच्या महिला क्रिकेटर्सनी सर्वोत्तम कामगिरी केली. मला तुमचा अभिमान आहे अशा शब्दात मोदींनी संघाचे कौतुक केले.

ट्विटरवरही महिलांच्या पराभवापेक्षा तुम्ही लाखो चाहत्यांची मने जिंकली अशा आशयाचे सपोर्ट करणारे मेसेज फिरतायत. तुम्ही फायनलमध्ये जरी हरला असलात तरी आमच्यासाठी तुम्ही विनर आहात, असे अनेकांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *