शानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप

राष्ट्रपती प्रणब मुखर्जीं यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात निरोप देण्यात आला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जी यांचं संसदेत स्वागत केलं.

सुमित्रा महाजन यांनी प्रणव मुखर्जी यांच्या कार्याचा गौरव केला. राष्ट्रपती म्हणून प्रणवदांनी आदर्श निर्माण केल्याचं त्या म्हणाल्यात. सुमित्रा महाजन यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना स्मृतिचिन्ह तसेच संसद सदस्यांच्या स्वाक्षरीचे कॉफी टेबल बुक आणि निरोपाचे भाषण भेट म्हणून दिले.

संसदेने आपल्याला घडवल्याचं मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात म्हटलं. तसंच संसदेतील गोंधळावरही त्यांनी चिंता व्यक्त करत काम करण्याचा सल्ला उपस्थित सदस्यांना दिला. यावेळी प्रणवदांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *