उत्तराखंडमध्ये भाविकांच्या बसला अपघात, २ ठार

 औरंगाबादच्या यात्रेकरूंच्या बसला उत्तराखंडमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन महिला भाविकांचा मृत्यू झालाय. तर 33 जण जखमी झाल्येत.

जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना हेलिकॉप्टरन डेहराडूनला उपचारासाठी हलवण्यात आलंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलम्ब्री तालुक्यातल्या निधोणा गावातले हे यात्रेकरू आहेत.

बद्रीनाथाचं दर्शन घेऊन हे यात्रेकरू हृषिकेशकडे निघाले होते. त्यावेळी चामोली जिल्ह्यात कर्णप्रयाग इथं त्यांची बस दरीत कोसळली. ठकुबाई साबले आणि भगुबाई साबले अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत.

दरीत कोसळल्यानंतर बस एका खडकामध्ये अडकल्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. अन्यथा दरीमध्ये तुफानी वाहणाऱ्या अलकनंदा नदीमध्ये बस कोसळली असती, तर मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *