पुण्यातील धरणातून पाणी सोडण्याची शक्यता

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरूवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील ओढे नाले दुथडी भरून वाहत असून मोठ्या प्रमाणावर पाणी धरणात येत असल्याने मुठा नदीत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.  खडकवासला धरण साखळीमधील खडकवासला धरण शुक्रवारी सकाळी 83  टक्के भरले. दहा दिवसांपूर्वी या धरणातील. 50 टीएमसी असलेला पाणी साठा 1.62 टीएमसी झाला आहे. तर पानशेत धरणही 75 टक्के भरले आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चारही धरणाचा पाणीसाठयाने मागील वर्षीच्या पाणीसाठा ओलांडला आहे. 21 जुलै रोजी मागील वर्षी या धरणामध्ये 15.77 टीएमसी पाणीसाठा होता या वर्षी तो गतवर्षी पेक्षा सव्वा टीएमसीने वाढला आहे. तर या धरण साखळीमधील सर्वात मोठे वरसगाव धरणंही 50 टक्के भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

पाणी सोडण्याची शक्यता
पावसाळयाच्या प्रत्येक दिवशी या धरणामध्ये पुढे होणारा पाऊस लक्षात घेऊन धरणांमधून काही प्रमाणात पाणी सोडावे लागते. त्यातच या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात अती मुसळधार पाऊस झाल्याने शुक्रवारी संध्याकाळपर्यंत खडकवासला धरण भरण्याची शक्यता आहे. तर पानशेत धरणही 80 टक्क्यांपेक्षा जास्त भरू शकते. त्यामुळे धरणसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खडकवासला धरणातून पुढील काही तासात अथवा दिवसात मुठा नदीत काही प्रमाणात पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.
धरणाचे नाव आणि पाण्याची टक्केवारी
खडकवासला : 83 टक्के
पानशेत : 75 टक्के
वरसगाव : 50 टक्के
टेमघर : 33 टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *