मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा..

मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावाजवळ झाड कोसळलंय. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्यात.

मध्यरात्री १२ वाजल्याच्या सुमारास झाड पडलं. हे झाड पडल्यामुळे दोन्ही बाजूच्या वाहतुकीवर परिणाम झालाय.

गोव्याकडे जाणाऱ्या आणि गोव्याकडून येणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बुलडोझरच्या मदतीनं झाड बाजूला करण्याचं काम सुरु आहे. पण अद्याप ते शक्य झालेलं नाही.

पहाटेच्या सुमारास वाहतूक सुरू झाली असून अत्यंत धिम्या गतीनं वाहनं पुढे सरकत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *