खंडाळा घाटात दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीला फटका

मुंबईकडून हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्स्प्रेससमोर खंडाळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकीहील स्टेशनदरम्यान दरड कोसळली.

 एक्स्प्रेसचं इंजिन आणि एक बोगी रेल्वेरूळांवरून उतरली आहे. त्याबरोबरच अनेक मोठमोठे दगड रेल्वे डब्याच्या खाली तसेच दोन डब्यांच्या मधल्या भागात अडकले होते.  घसरलेलं इंजिन काढण्यात आलंय. तसंच गाडीला दुसरं इंजिन जोडून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. पण सर्वच एक्स्प्रेस गाड्या साडे तीन तास उशीराने धावत आहेत.

अनेक एक्स्प्रेस गाड्या साईडींगला लावण्यात आल्या होत्या. त्या कर्जतकडे रवाना करण्यात आल्या आहेत. ठाकूरवाडी सोडल्यानंतर काही अंतर पुढे आल्यावर एका बोगद्यामधून एक्सप्रेस बाहेर पडत असताना ही घटना घडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *