नाशिकमध्ये पोलिसावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न

नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला.अज्ञात इसमाने मागून येऊन तीक्ष्ण हत्याराने  पोलिसावरच वार केला आहे.

भद्रकाली पोलीस ठाण्याचे हवालदार बाळू खरे यांच्यावर हा हल्ला झाला आहे.

हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, या हल्ल्यातून बाळू खरे थोड्यक्यात बचावले. घटनेबाबत गुन्हा मात्र अद्यापही दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.

पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचेच गुन्हे दाखल होत नसतील तर सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *