कैदी मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणानंतर देशभरातल्या ३० महिला खासदार आज भायखळा कारागृह भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतलेय.
भायखळा महिला तुरुंगात वॉर्डन असलेल्या मंजुळा शेटये हिचा जेलर मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांच्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली.
याप्रकरणी तुरुंग प्रशासनाच्या बाजूने तपास करणाऱ्या पोलीस उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी आरोपींची बाजू घेतली. यानंतर त्यांना तपासातून हटविण्यात आले. या घटनेनंतर तुरुंगात महिला कैद्यांचा छळ होत असल्याचे विदारक चित्र सर्वांसमोर आले. त्यानंतर केंद्राने दखल घेतली.
