भरतनाट्यम डान्सर बनण्याचं होतं मितालीचं स्वप्न

भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. इतकंच नाही, तर ६००० धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटूही बनली आहे. पण धावांचा डोंगर सर करणाऱ्या मितालीचं लहानपणीचं स्वप्न एकदम वेगळं होतं. तिला लहान असताना क्रिकेटमध्ये काहीही रस नव्हता. लहानपणापासूनच मिताली राज हिला भरतनाट्यम डान्सर बनायचं होतं. तिने भरतनाट्यमचं शिक्षणही घेतलं आहे. मिताली 10 वर्षांची असताना ती उत्तम क्रिकेटर होइल, असं भाकीत तिचे कोच संपत कुमार यांनी केलं होतं. त्याचं ते भाकीत आज खरं झालं आहे.
मितालीचे वडील दोराई राज ती 10 वर्षाची असताना सिंकदराबादमधील सेंट जॉर्न कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन जायचे. मितालीला उशिरा उठायची सवय होती. पण तिच्या वडिलांनी तीची सवय मोडून तिला लवकर उठायची सवय लावली.  मितालीचा भावाला क्रिकेट कोचिंगसाठी पाठवताना मितालीलाही तिचे वडील कॅम्पमध्ये घेऊन जायचे. त्यावेळी दोराई राज यांचे मित्र ज्योती प्रसाद यांनी मितालीच्या भावाऐवजी मिताली उत्तम क्रिकेटर बनू शकते, असं सांगितलं होतं. त्यामुळे मुलाऐवजी तुमच्या मुलीच्या ट्रेनिंगसाठी लक्ष केंद्रीत करावं, असं तिच्या वडिलांना सांगितलं होतं. तिथूनच मितालीचा क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला.
26 जून 1999 मध्ये आयलँडविरूद्ध झालेल्या सामन्यात मितालीने 114 धावा केल्या होत्या. तेव्हा शतक झळकवणारी ती सगळ्यात तरूण खेळाडू ठरली होती.
१६ वर्षे २०५ दिवस एवढे वय असताना मितालीने महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकाविले. ती सर्वांत तरुण फलंदाजी ठरली. १७ वर्षांखालील कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *