रिलायन्स जिओची नवीन ऑफर; ३९९ रूपयांत ८४ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा

रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी खूशखबर आहे. जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवी योजना सादर केली आहे. धन धना धन ऑफर अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे त्यांनी नवीन ऑफर सादर केली असून हा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांसाठी असल्याचे सांगण्यात येते. कंपनीने ही नवीन ऑफर जिओ धन धना धन ऑफर या नावानेच सादर केली आहे. या प्लॅनचे नावच फक्त जुने आहे. बाकी सर्व नवीन असून यात अनेक बदल करण्यात आले आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनचा फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे जिओ प्राइम मेंबरशिप असणे आवश्यक आहे. जिओच्या प्रीपेड प्लॅनची सुरूवात १९ रूपयांपासून होते आणि सर्वात महागडा प्लॅन हा ९९९९ रूपयांचा आहे.

जिओ धन धना धनच्या ऑफरमध्ये सुरूवातीला कंपनीने ३०९ रूपयांच्या रिचार्ज पॅकवर एक महिन्याची वैधता असल्याचे म्हटले होते. आता याच प्लॅनमध्ये ग्राहकांना ५६ दिवसांची वैधता मिळेल आणि ५६ जीबी ४ जी स्पीड डेटा देण्यात येईल. तर दुसरा प्लॅन ३९९ रूपयाचा असेल. याची वैधता ८४ दिवस आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी ४ जी स्पीड डेटा मिळेल. तर पोस्टपेड प्लॅनची सुरूवात ३०९ रूपयांपासून होते. याचा सर्वांत महागडा प्लॅन हा ९९९ रूपयांचा आहे.

प्रीपेड प्लॅन
१९ रूपये: एक दिवस वैधता. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल त्याचबरोबर २०० एमबी डेटा मिळेल.

४९ रूपये: ३ दिवस वैधता. यामध्ये अमर्यादित व्हॉईस कॅालिंग व ६०० एमबी डेटा मिळेल.

९६ रूपये: ७ दिवस वैधता. अमर्यादित व्हॉईस कॉल आणि एसएमएसची सुविधा. दररोज १ जीबी ४ जी डेटा. त्यानंतर कमी स्पीडवर डेटा मिळेल.

१४९ रूपये: २८ दिवस वैधता. अमर्यादित कॉल, ३०० एसएमएस मोफत. २ जीबी ४ जी स्पीड डेटा

३०९ रूपये: ५६ दिवस वैधता. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल. दररोज १ जीबी डेटा.

३४९ रूपये: ५६ दिवस वैधता. सर्व सुविधा अमर्यादित शिवाय २० जीबी ४ जी स्पीड. यामध्ये दररोज डेटा वापरण्यावर कोणतीच मर्यादा नाही.

३९९ रूपये: ८४ दिवस वैधता. यामध्ये दररोज १ जीबी ४ जी इंटरनेट. अमर्यादित कॉल आणि एसएमएस सुविधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *