अमेरिकेच्या सैनिकी विमानाला अपघात, 16 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये एका लष्करी विमानाला अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरीन कॉर्पचं USMC KC-130 विमान मिसिसिपीतील  LeFlore County परिसरात क्रॅश झाले. विमान दुर्घटनेबाबतची माहिती यूएस मरीननं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे दिली.
”सीएनएन”नं दिलेल्या वृत्तानुसार काउंटीचे आपात्कालीन विभागाचे प्रमुखांनी सांगितले की, विमान दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. विमानात एकूण 16 जण होते आणि त्यांचे हयात असल्याचे काहीही पुरावे हाती लागले नाहीत. दरम्यान, हेलिकॉप्टरद्वारे दुर्घटनास्थळाच्या आसपास परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
मरीन कॉर्प्सच्या प्रवक्त्यानं सांगितले की, USMC KC-130 विमानाला सोमवारी रात्री (10 जुलै ) अपघात झाला. दरम्यान ही दुर्घटना कोणत्या कारणांमुळे घडली आहे, याची माहिती अद्यापपर्यंत कळू शकलेली नाही. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार 16 जणांचा मृत्यू झाला आहे.  KC-130 विमानाचा उपयोग लष्कर अनेक कामांसाठी करतं. विशेषतः कारगो किंवा सैनिकांना एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचवणे यांसारख्या अनेक कामांसाठी या विमानाचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *