रेल्वे प्रवासात महिलांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आलीय. हावडा मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमध्ये ३७ वर्षीय महिलेचा एका बांग्लादेशी तरुणाने विनयभंग केल्याची घटना नागपूर भुसावळ दरम्यान घडलीय. या तरुणाला भुसावळ पोलिसांनी अटकही केली.
याप्रकरणी मुंबई रेल्वे पोलिसांत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध विनभंग तसेच परदेशी नागरिक कायद्याप्रमाणे भुसावळ रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरु येथील ३७ वर्षीय महिला हावडा मुंबई दुरांतो एक्स्प्रेसमधून एकटी प्रवास करत असताना शेजारच्या बर्थवरील मोहमंद युसूफ सुलेमान या २३ वर्षीय बांग्लादेशी तरुणाने झोपेत असलेल्या या महिलेचा विनभंग केला. तिनं हा प्रकार टीसीला सांगितल्यानंतर महिलेने मुंबई रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली. आरोपी बांग्लादेशी तरुणाला भुसावळ पोलिसांनी अटकही केली आहे.
