नालासोपारा येथील आगीत ६ दुकाने जळून खाक

नालासोपारा शहरातील तिवारी नगर तुळींज रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत दुकानाना आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत सुमारे सहा दुकाने जळून खाक झालीत.

घटनास्थळाला तुळींज पोलिसांनी तात्काळ भेट देऊन पाहाणी केली. त्यांनी तात्काळ अग्नीशामक दलास घटनेची माहिती दिली. अग्नीशामक दलाच्या दोन गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.

आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असून अग्नीशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी आग शॉटसर्कीटने लागल्याची माहिती दिलेय. या आगीचा तपास सुरु असून अधिकृत आगीचे कारण समजू शकलेले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *