फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी खाताय?

अंडी खाणे आरोग्यदायी मानले जाते. अंड्यातून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळतात ती शरीराची ताकद वाढविण्यासाठीही उपयुक्त असतात. घाईच्या वेळीही कधी नाश्ता म्हणून तर कधी जेवणात पोळीसोबत अंडे खाता येते. असे हे वेळ वाचवणारे आणि आरोग्यदायी अंडे आहारात असावे असे डॉक्टरही खायला सांगतात. आठवडाभर असणाऱ्या धावपळीमुळे गृहीणी अनेकदा एकाचवेळी दोन ते तीन दिवसांची अंडी आणून ठेवतात. ही अंडी फ्रिजमध्ये साठवून ठेवली जातात. ही अंडी फ्रिजमध्ये ठेवल्याने चांगली राहतात असे आपल्याला वाटते खरे. मात्र अशाप्रकारे फ्रिजमध्ये ठेवलेली अंडी वैज्ञानिकांच्या मते आरोग्यासाठी धोकादायक असत.

अंड्याच्या पिवळ्या भागात मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. अंडे खल्ल्यामुळे तुमचे वजन नियंत्रीत राहते. शिवाय कमी होण्यास मदत मिळते. आपल्या मेंदूसाठी अंडे अधिक फायदेशीर आहे. अंड्यातील पांढऱ्या भागापैकी पिवळा भागात जास्त पोषक घटक असतात. रुममधील सामान्य तापमानात अंडी साधारण ७ ते १० दिवस चांगली राहू शकतात. तर फ्रिजमधील अंडी ३० ते ४० दिवस चांगली राहतात. मात्र त्यातील स्वाद, ताजेपणा, चव पोषकद्रव्ये निघून जातात आणि त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही. फ्रिजमध्ये अंडी ठेवल्याने ती जास्त थंड होतात. त्यामुळे त्यातील पोषक द्रव्ये निघून जातात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारी अंड्यातून मिळणारी पोषकद्रव्ये निघून जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *