भारतीय हद्दीत घुसखोरी करणा-या चीनने उलट भारतावरच नियम मोडल्याचा आरोप केला आहे. सिक्कीमच्या डोकाला भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने घुसखोरी करुन भारतीय जवानांना धक्काबुक्की केल्याने दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. भारत नियमबाहय कामे करत असून त्यांना नियम शिकवण्याची गरज असल्याचे ग्लोबल टाइम्स या चीन सरकारच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे.
चीनला अमेरिका आणि अन्य पाश्चात्य देश पाठिंबा देत असल्याने आपण सैनिकी दृष्टया वरचढ असल्याची भारताची भावना असून त्यामुळे भारत उद्दामपणा करतोय असे ग्लोबल टाइम्सच्या लेखात म्हटले आहे. भारताचा जीडीपी जगात पाचव्या क्रमांकावर असल्याने देश म्हणून भारताचा आत्मविश्वास सध्या भलताच उंचावला आहे. पण भारत अजून चीनपेक्षा भरपूर मागे आहे हे भारताने लक्षात घ्यावे असे ग्लोबल टाइम्समध्ये म्हटले आहे.
