आजारपणाला कंटाळून वॉचमनने घेतला गळफास

औद्योगिक वसाहतीमधील एका खाजगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत प्रदीप श्यामराव कोळी (वय-50, रा. एमआयडीसी परिसर) यांनी राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी 10़ 50 वाजता घडली. काही दिवसांपासून कोळी हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होत़े  त्याला कंटाळून त्यांनी जीवनयात्रा संपविल्याची माहिती मिळाली आह़े

प्रदीप कोळी हे मूळ भुसावळ तालुक्यातील मोंढाळे येथील रहिवासी आहेत़ आई-वडीलांचे निधन झाल्यानंतर ते लहान भावासह राहत होत़े चार वर्षांपूर्वी त्यांनी रोजगाराच्या निमित्ताने प}ी, तीन मुली व एक मुलगा यांच्यासह जळगाव गाठल़े  एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत ते सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागल़े   बुधवारी रात्री काम आटोपून कोळी सकाळी व्ही. सेक्टर मध्ये असलेल्या खोलीवर परतल़े घरी कुणी नसल्याचे पाहून त्यांनी छताला  ओढणीने गळफास घेतला़ परिसरातील कामगारांसह त्यांच्या नातेवाईकांनी कोळी यांना जिल्हा रूग्णालयात हलविल़े  या ठिकाणी वैद्यकिय अधिका:यांनी त्यांना मृत घोषित केल़े याप्रकरणी  अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *