इंडोनेशियाची राजधानी जकार्ता दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरली

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर दुहेरी बॉम्बस्फोटाने हादरलं. बॉम्बस्फोटात ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे. तर अनेक जण या स्फोटात जखमी झाले आहेत.

जकार्तामधील बस ट्रान्सपोर्ट टर्मिनलजवळ हे दुहेरी बॉम्बस्फोटा  झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री 9 च्या दरम्यान पाच मिनिटांच्या अंतराने हे स्फोट झाले. हा स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटात वित्तहानीही मोठ्या प्रमाणात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून जखमींवर जवळच्याच रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *