एका रसगुल्ल्यामुळे मोडलं लग्न

  उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये एक लग्न एका रसगुल्ल्यामुळे मोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाकडचे पाहुणे मुलीकडे पोहोचले. जोरदार त्यांचं स्वागत करण्यात आलं. नाचत गात वधु पक्षाच्या दारात पोहोचताच मुलीकडच्या लोकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. सगळं काही ठिक सुरु होतं. त्यानंतर आलेल्या पाहुण्यांना नाश्ता आणि कॉफी दिली गेली.

 मुलीच्या वडिलांनी मुलाकडच्या पाहुण्यांना जेवन करण्यासाठी व्यवस्था केली. कारण नंतर बाकीच्या विधी लवकर सुरु करता येतील. चांगल्या पद्धतीने पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. अचानक मुलीचा आणि मुलाच्या चुलत भाऊ यांच्यामध्ये वाद सुरु झाला.
जेवनाच्या ताटात दोन रसगुल्ले ठेवल्याच्या कारणाने हा वाद सुरु झाला. मुलीकडच्या एका नातेवाईकाला प्रत्येकाला एकच रसगुल्ला देण्यास सांगितलं होतं. पण मुलाच्या नातेवाईकाने दोन रसगुल्ले घेतले म्हणून त्याला टोमणा मारला. यावरुन वादाला सुरुवात झाली. वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. लोकं एकमेकांचे प्लेट फेकू लागले. मुलाकडच्या लोकांनी संपूर्ण जेवण मंडपात फेकून दिलं.
वाद थांबत नव्हता म्हणून पोलिसांना बोलावण्यात आलं. पंचायत बोलवण्यात आली. त्यामध्ये लग्नच्या पुढच्या गोष्टी सुरु कराव्या असं ठरलं पण मुलीने लग्नासाठी नकार दिला आणि लग्न मोडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *