ठाण्यातील नव्या बांधकामांना कोर्टाची बंदी

‘बांधकामे थांबू शकतात, पण माणसे पाण्याविना जगू शकत नाहीत’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे येथील घोडबंदर रोड परिसरातील नव्या बांधकामांना बंदी घातली आहे. तसेच ९ जूनपर्यंत नव्या बांधकामांच्या प्रस्तावांना सीसी देऊ नका आणि बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांना ओसी देऊ नका, असा आदेश ठाणे महानगरपालिकेला दिला आहे.

रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाईला व पाणी कपातीला सामोरे जावे लागत असताना ठाणे महापालिका त्याची पुरेशी तरतूद न करताच नव्या बांधकामांना सरसकट परवानगी देत आहे. त्यामुळे प्रश्न आणखी गंभीर होत आहे, असे म्हणणे मांडणारी जनहित याचिका मंगेश शेलार यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाने हा अंतरिम आदेश दिला.

त्यानुसार, ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील नव्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे तर ९ जूनपर्यंत नव्या बांधकामांच्या प्रस्तावांना सीसी देऊ नका आणि बांधकाम पूर्ण झालेल्या बांधकामांना ओसी देऊ नका, असे आदेश हायकोर्टाने ठाणे महापालिकेला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *