हाजीअलीमध्ये भीषण अपघात, चौघे जण जखमी

मुबईच्या रस्त्यावर काल पुन्हा एकदा भरधाव वेगात गाडी चालवण्याच्या नादात झालेल्या भीषण अपघातात चौघे जण जखमी झालेत.

हाजी अली परिसरात झालेल्या अपघातात गाडीची स्थिती बघून अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. होंडा मोबिलिओचा हा अपघात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय.

हाजी अलीच्या रस्त्यावर चालक इतका वेगात गाडी चालवत होता, की त्याचं नियंत्रण सुटल्यावर गाडी रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलिकडच्या बाजूला जाऊन पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *