‘परवानगीशिवाय सरकारी किंवा खासगी कंपन्यांच्या वतीने पंतप्रधानांचा फोटो छापल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. तसेच पंतप्रधानांना खूश करण्यासाठी किंवा त्यांच्या जवळ असल्याचे दाखवण्यासाठी असे प्रकार होण्याची ही पहिलीच वेळ नाही’, अशी माहिती अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. रिलायन्स इंडस्ट्रिजची टेलिकॉम कंपनी ‘जिओ’ आणि ‘पेटीएम’च्या जाहिरातीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो परवानगीशिवायच वापरण्यात आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडरवरुन यापूर्वीही महात्मा गांधी यांचा फोटो वापरण्यात आला नव्हता. 1996, 2002, 2005, 2011,2012, 2013 आणि 2016 या वर्षीही कॅलेंडरवर महात्मा गांधींजींचा फोटो नव्हता, असं स्पष्टीकरण केव्हीआयसीनं दिले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकप्रिय आणि खादीचे समर्थक असल्याने त्यांचा फोटो वापरण्यात आला, असे केव्हीआयसीतील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. ‘ऑक्टोबर 2016मध्ये मोदींनी लुधियानातील महिला विणकरांना 500 चरख्यांचे वाटप केले होते. या कारणामुळे कॅलेंडरवर मोदींचा फोटो छापण्याचा निर्णय घेण्यात आला’, अशी माहितीही या अधिका-याने दिली.