डेंग्यूच्या लसीकरणामुळे झिकाचा धोका

डेंग्यूविरोधी लसीकरणामुळे झिकाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांकडून याबाबत नुकतेच एक संशोधन समोर आले आहे. जगातील एकूण लोकसंख्येचा तिसरा भाग हा अशा भागात राहतो जेथे डेंग्यूचा धोका आहे आणि तिथे झिकाचे रुग्णही आढळून आले आहेत.

संशोधकांनी झिका आणि डेंग्यू या रोगांमधील संबंधांचा अभ्यास केला. त्या वेळी असे निदर्शनास आले की, डेंग्यूला रोखण्यासाठी केलेल्या लसीकरणामुळे डेंग्यूच्या विषाणूंना आळा बसतो परंतु झिकाचे विषाणू पसरण्यास मदत होते. संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले असता त्यांना आढळले की, डेंग्यूच्या लसीकरणामुळे झिकाच्या विषाणूंना शरीरात पसरण्यास पाठबळ मिळते ते अधिक मजबूत होतात. यासाठी त्यांनी एका ‘मॅथ मॉडेलचा’ शोध लावला त्यानुसार डेंग्यूच्या विषाणूंना आळा बसवण्यासाठी केलेले लसीकरण झिकाचे रुग्ण वाढवण्यास मदत करते. त्यामुळे डेंग्यूची लस जितक्या जास्त रुग्णांना देण्यात येईल झिकाचे प्रमाण तितकेच वाढेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *