कल्याणजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-ठाकुर्ली स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे सीएसटीच्या दिशेने जाणा-या वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. तर कर्जत,कसा-याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. ऐन कामावर जाण्याच्या वेळी आणि गर्दीवेळी हा खोळंबा झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या सततच्या विस्कळीत होण्यावर, तांत्रिक बिघाडावर प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.  दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *