हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी अधिका-याला दिल्लीतून अटक

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिका-याला पोलिसांनी अटक केली आहे. या अधिका-याकडून भारतीय लष्करासंबंधित गोपनीय कागदपत्रेदेखील जप्त करण्यात आली आहेत. मोहम्मद अख्तर असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी अधिका-याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे या पाकिस्तानी अधिका-याला मदत करणा-या त्याच्या दोन भारतीय साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
याआधी नोव्हेंबर 2015 साली, हेरगिरीच्या संशयावरुन पाकिस्तान उच्चायुक्तालयातील काही अधिकारी तेथील गुप्तचर यंत्रणांशी संपर्कात आहेत का, याची चौकशी करण्यात आली होती, आणि चौकशीअंती पाच जणांना अटकही करण्यात आली होती.
 दरम्यान, दहशतवाद, शस्त्रसंधीचे उल्लंघन यावरुन आधीच भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेलेले असताना हेरगिरीच्या आरोपाखाली या अधिका-याला अटक करण्यात आली आहे. विशेषतः दोन्ही देशांमधील तणाव उरी दहशतवादी हल्ल्यानंतर आणखी वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *