भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर पाकिस्तानचे तीन सैनिक ठार

सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. रात्रभर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या जवानांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर अनेक बंकर उद्धवस्त झाले.

आंतरराष्ट्रीय सीमेजवळील लष्करी चौक्यांवर, नागरी वस्तीवर पाकने मंगळवारी पुन्हा गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा सुरू केला पाकिस्तानच्या गोळीबारात सहा नागरिक जखमी झाले आहेत.  राजौरी जिल्ह्यातील नौसेरा भागातील पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे.

जवानांच्या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरूच आहे. दरम्यान, सीमाभागात पाक सैनिक गोळीबार करीत असल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *