पाकिस्तानला दहशतवादी म्हणल्यामुळे चीनला मिरच्या झोंबल्या

पाकिस्तान दहशतवाद्यांचा गड असल्याची टीका गोव्यात झालेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. मोदींनी केलेल्या या टीकेमुळे चीनला चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत.

कोणत्याही देशाला किंवा धर्माला दहशतवादाशी जोडायला आमचा विरोध असल्याची प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्री हुआ चुनयींगनी दिली आहे. पाकिस्ताननं बलीदान केलं आहे. दहशतवादाविरोधात त्यांचं योगदान मोठं आहे, असंही चुनयींग बरळल्या आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांशी चर्चा करून मतभेद मिटवावेत असा सल्लाही चीननं भारत आणि पाकिस्तानला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *