पाकिस्तानची ‘पाण्या’साठी धावाधाव

      पाकिस्तानची ‘पाण्या’साठी धावाधाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधू पाणी वाटप करारासदंर्भात ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ असे  वक्तव्य केल्यानंतर भारत हा करार रद्द करेल ही भीती पाकिस्तानला आहे. पाकिस्तानच्या सीनेटमध्ये याचे पडसाद उमटले असून पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरजात अजीज यांनी भारताने असा निर्णय घेतलाच तर पाकिस्तान ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस’कडे दाद मागेल असे सांगितले आहे.
 1960 ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने हा करार झाला होता.
 अजीज म्हणाले, ‘दोन्ही देशांतील हा सर्वात यशस्वी करार आहे. हा करार रद्द केला तर ते युद्धच समजले जाईल. हा करार रद्द करण्याची तरतूद नाही, पण भारताने हा करार एकतर्फी रद्द केला तर पाकिस्तानला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसकडे दाद मागेल.
 भारताने हा करार रद्द केला तर पाकिस्तानची फार मोठी आर्थिक कोंडी होणार आहे. तर हा करार रद्द केला तर भारताला सिंधू, चिनाब आणि झेलम या नद्यांचे पाणी वापरण्यास मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *