टँकरवाडा अशी ओळख बनलेला मराठवाडा आता पाणीदार झालाय. कारण काही दिवसात झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील नदी-नाले तर दुथडी भरुन वाहतायत. पण ज्या बोअरवेलला हंडाभर पाणी येत नव्हतं त्या बोअरवेलमधून आपोआप पाणी वाहू लागलंय.
मे महिन्यात बर्ड आय व्हिव्यनं दिसणारं मांजरा धरण….बीड-उस्मानाबाद सीमेवरचं…..२५० दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याचं…ज्या धरणाचं पाणी ४३ वर्ग किलोमीटरपर्यंत पसरतं. ते धरण आज ओसंडून वाहतंय.
चारच दिवसात धरणात एवढं पाणी आलं की पहाटे सहा वाजता…सहा दरवाजे उघडून पाणी सोडून द्यावं लागलं…२५० क्युसेक्स क्षमतेनं पाण्याचा विसर्ग असल्यानं प्रशासनानं मांजरा काठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिलाय.
ड्रोनमधून दिसलेलं बिंदुसरा. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं ९ एमएमक्युब क्षमतेचं धरण. फेब्रुवारी २०१५ पासून कोरडंठाक होतं. पण दोन दिवसाच्या पावसानं धरणात जीव आलाय.
५९८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठ्याची क्षमता असलेलं तेरणा नदीवरचं माकणी धरण. ड्रोन मधून पाहिलं तेव्हा धरणात फक्त ५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता..आज धरणात ७० टक्के पाणी आलंय.
उस्मानाबादच्या येडशी गावातल्या ४०० फुटाच्या बोअरमधून आपोआप पाणी बाहेर पडू लागलंय.गेल्याचं आठवड्यात या बोअर मधून घागरभर पाणी येत नव्हतं. यावर विश्वास बसणार नाही..जालन्याच्या चितळी पुतळी गावातल्या २२० फुटाच्या बोअरला अपोआप उकळी फुटलीय.
गेल्या दोन दिवसापासून मराठवाड्यातल्या पावसाचा जोर ओसरलाय. परतीच्या पाऊस परत गेल्याचं दिसतंय. जाता-जाता या मरुभूमित पावसानं जी जान आणलीय. त्यामुळे दोन-तीन वर्षे तरी पाणी टंचाई होणार नाही अशी अशा आहे. फक्त मिळालेलं पावसाचं दान जपून वापरण्याची सुबुध्दी सगळ्यांना मिळायला हवी.

