ठाण्यात ‘सामना’च्या कार्यालयावर शाईफेक

शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये मराठा समजाच्या मूक मोर्चाबाबत छापून आलेल्या व्यंगचित्राचे पडसाद राज्यातल्या विविध भागात उमटत आहेत. आज दुपारी ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे.

दोन अज्ञात बाइकस्वारांनी सामनाच्या कार्यालयावर दगडफेक आणि शाई फेकल्याचं वृत्त आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावरही अज्ञातांनी दगडफेक केली.

राज्यभर निघत असणार्‍या मराठा क्रांती मूक मोर्चावर सोमवारी ‘सामना’तून विडंबनात्मक व्यंगचित्र छापून आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *